• खाडगाव ,ता. लातूर ,जिल्हा. लातूर ४१३५१२

आपले काही प्रश्न?

व्यसन म्हणजे एखादी अशी सवय कि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शारिरीक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असुनही त्यात बदल करणे शक्य होत नाही.

व्यसन हे एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात अडकलेल्या पिढीला बाहेर काढणे व त्यांना निरोगी, सुखी व समाधानी बनवणे म्हणजे व्यसनमुक्ती होय.

व्यसनमुक्ती केंद्रातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनखालील योग्य औषधोउपचार व तज्ञांकडून दिलेल्या वैयक्तिक, कौटुंबिक व वैवाहिक सल्यामुळे व्यसनी व्यक्ती लवकर बरा होतो.

व्यसनी व्यक्तीचे प्रश्न, समस्या व मानसशास्त्र समजून घेऊन त्यावर पर्याय शोधणे तसेच संवाद-वाद-सुसंवाद करून त्यांची चुकलेली वाट दुरुस्त करण्याचा सल्ला देणे म्हणजे समुपदेशन होय.

अंमली पदार्थ न मिळाल्याने पहिल्या आठवड्यात रुग्णाला त्रास सुरु होतो, अशा त्रासाला Withdrawal Symptoms म्हणतात. अशावेळी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णावर उपचार केले जातात.

मुक्तिग्राम मित्र मंडळ

मुक्तिग्राम मित्र मंडळ १९९९ पासुन व्यसनाने त्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींना मानसिक, शारिरीक आणि कौटुंबिक समस्येतून बाहेर काढण्यास मुक्तिग्राम व्यसनमुक्ती केंद्राने मोलाची कामगिरी पार पाडली आहे. असंख्य व्यक्तीच्या दुवा आणि शुभेच्छा यांची शिदोरी बरोबर घेऊन...

संस्थेची पार्श्वभूमी

मुक्तिग्राम मित्र मंडळ व्यसनमुक्ती उपचार केंद्राची सुरुवात 1998 साली झाली. 1998 पासून व्यसनाने त्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींना मानसिक आजारातून आणि शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक इत्यादी समस्येतून बाहेर काढण्यासमुक्तिग्राम मोलाची कामगिरी पार पाडली आहे. असंख्य व्यक्तीच्या दुवा आणि शुभेच्छा यांची शिदोरी बरोबर घेऊन... लातूर भागात व्यसनाधीन लोकांच्या उपचाराची गरज लक्षात घेऊन मुक्तिग्राम व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यात आले आणि आतापर्यंत 8500 रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.

service-icon

व्यायाम व योगा

दररोज सकाळी केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, योगा, प्राणायाम, सुर्यनमस्कार यांचा तज्ञ व्यतींकडून कार्यक्रम घेतला जातो

service-icon

२४/७ रुग्ण सेवा

बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची हेळसांड होऊ नये म्हणून मुक्तिग्राम मित्र मंडळ व्यसनमुक्ती उपचार केंद्र हे २४/७ चालू असते

service-avater-image
service-icon

मधुर संगीत

केंद्रामध्ये दिवसाची सुरुवात हि मधुर संगीतमय गाण्याने होते. संगीत हे मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. संगीतामुळे वातावरण शुद्ध व प्रसन्न होते.

service-icon

बाहेरचा फेरफटका

आमचे सहकारी दररोज सकाळी सर्व रुग्णांना घेऊन बाहेर फेरफटका मारतात. दररोज किमान १-२ किलोमीटर सर्वजण फिरायला जातात